चांद्रयान-३ : जितके ज्ञान आपण अवकाशाबद्दल मिळवतो, तितकी आपली ‘पृथ्वीवासी’ ही ओळख घट्ट होत जाते...
२००१नंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था इतर देशांचे उपग्रह सोडण्याची सेवा पुरवू लागली आणि त्यातून अवकाश तंत्रज्ञान विकसित करणे, हा केवळ पांढरा हत्ती नाही, तर कार्यक्षम, खात्रीशीर व परवडण्याजोगे तंत्रज्ञान विकसित करून एक उत्पन्नाचे साधनही बनू शकते, हे अधोरेखित झाले. मानवी समाजाला या शतकात जागतिक तापमानवाढीच्या संकटातून वाचवण्यासाठी करण्याच्या उपायांमध्ये या तंत्रज्ञानाला आज महत्त्वाचे स्थान आहे.......